कोरोना

सोलापुरात तीन दिवसांत आढळले ९९१ बाधित रूग्ण

Newsliveमराठी – सोलापूर शहराच्या तुलनेत जिल्हा ग्रामीणमध्ये करोनाचा फैलाव वाढतच असून मंगळवारी ग्रामीणमध्ये २४४ नवे बाधित रूग्ण सापडले, तर नऊ रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच सोलापूर शहरात ११३ नवे बाधित रूग्ण आढळून आले आणि एक रूग्ण दगावला. गेल्या तीन दिवसांत शहर व जिल्ह्यात मिळून ९९१ नवीन बाधित रूग्णांसह ३० मृतांची नोंद झाली आहे.

मंगळवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या नवीन बाधित रूग्णांमध्ये सर्वाधिक ६० रूग्ण माळशिरसमधील आहेत. त्यानंतर पंढरपूर – ४६, सांगोला – ३८, बार्शी – ३६, दक्षिण सोलापूर – २१, करमाळा – २० याप्रमाणे विविध तालुक्यांमध्ये नवे बाधित रूग्ण आढळून आले.

सोलापूर जिल्ह्यातील नागरी भागात ४८ रूग्ण आणि सहा मृत तर ग्रामीणमध्ये १९६ रूग्ण आणि तीन मृत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या एकूण बाधित रूग्णांमध्ये नागरी भागातील ३,०५० तर ग्रामीणमधील ५,०७२ अशी संख्या आहे. तर नागरी भागात ८२ आणि ग्रामीणमध्ये १४७ याप्रमाणे मृतांची संख्या आहे.