महाराष्ट्रशैक्षणिक

दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागाची बाजी

Newslive मराठी-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा
निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागानेच बाजी मारली आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त 98.77 टक्के लागला, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 92 टक्के आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

यंदा देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 96.91 टक्के लागला तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत 3.1 टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यातील नऊ विभागांची निकालीच टक्केवारी –
पुणे- 97.34 टक्के, नागपूर– 93.84 टक्के, औरंगाबाद– 92 टक्के, मुंबई 96.72 टक्के, कोल्हापूर– 97.64 टक्के,
अमरावती– 95.14 टक्के, नाशिक- 92.16 टक्के, लातूर- 93.9 टक्के व कोकण सर्वाधिक– 98.77 टक्के अशाप्रकारे
राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला.