आंतरराष्ट्रीयराजकारण

नरेंद्र मोदींजी राफेल प्रकरणात सगळा देश तुमच्याकडे बोट दाखवत आहे

Newslive मराठी- राफेल घोटाळ्याबाबत थेट माझ्याकडे कोणीही अंगुलिनिर्देश केलेला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणतात. पण नरेंद्र मोदींजी राफेल प्रकरणात सगळा देश तुमच्याकडे बोट दाखवत आहे. अशा शब्दात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला लोकसभेत केला.

नरेंद्र मोदी राफेल जेट प्रकरणात लोकसभेमध्ये येऊन उत्तर देण्यास कचरत आहेत. त्यांच्यात गट्स (धाडस) नाहीत. काल नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत मी पाहिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी थकलेले आणि घाबरलेले दिसले. असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, त्यांनी राफेल जेट खरेदी घोटाळ्याबाबत बोलताना आपल्यावर वैयक्तिक आरोप होत नसल्याचा दावा केला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की संपूर्ण देश त्यांना या प्रश्नावर उत्तर मागतो आहे. असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.