बातमीमहाराष्ट्र

साधना विद्यालयात वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ

Newslive मराठी-  हडपसर परिसरातील रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय सोमवारी वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झाला.

विद्यार्थ्यांनी नियमितपणे पाणी प्यावे या दृष्टिकोनातून शालेय तासिकांव्यतिरिक्त दिवसभरातून दोनदा वॉटर बेल दिली जाते. विद्यार्थ्यांना दोन मिनिटांचा विश्रांती दिली जाते. यादरम्यान सर्व विद्यार्थी आपल्या दप्तरातील पाण्याची बाटली काढून एकाच वेळी पाणी पितात.

वजन, उंची, वयानुसार मुलांनी रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. या कालावधीत शरीराला पाण्याची अनेकदा गरज असूनही अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पित नाहीत. अनेक लहान मुले सकाळी घरातून नेलेले पाणी पुन्हा घरी घेऊन येतात. यासाठी हा उपक्रम राबविणे आवश्यक आहे. असं यावेळी तुपे म्हणाले.

या उपक्रमामुळे साधना विद्यालय शाळेतल्या तासांच्या व्यतिरिक्त 2 वेळा वॉटर बेल दिली जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे, यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक