देश-विदेशमहाराष्ट्र

नवी मुंबईत चाचण्यांमध्ये वाढ; प्रतिदिन 1200 चाचण्या

Newslive मराठी- शहरात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली असून रोज 1200 च्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत. त्यात प्रतिजन चाचण्यांची भर पडली आहे. येत्या काळात अधिकाधिक प्रतिजन चाचणी केंद्रे सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे.

शीघ्र तपासणी, अलगीकरण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या आधारावर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नियंत्रणासाठीमिशन ब्रेक चेनघोषित केले आहे. अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या प्रतिजन चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

40 हजार प्रतिजन चाचण्यांचा संच पालिकेकडे सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त केंद्रे सुरूकरण्यात येणार आहेत. बाधित आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध. त्यांच्यात करोनासदृश लक्षणे असलेल्या प्रत्येकाची प्रतिजन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाशी सेक्टर10 मधील पालिकेच्या कोविड रुग्णालयात प्रतिजन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. आजवर शहरात 16 हून अधिक प्रतिजन चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-देशभरात 24 तासांत 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 654 जणांचा मृत्यू

-ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त; बिग बींना आनंदाश्रू झाले अनावर