आंतरराष्ट्रीयकोरोना

कोरोना बळींच्या संख्येत भारतानं टाकलं इटलीलाही मागे; जगात पाचव्या स्थानी

Newslive मराठी- जगात कोरोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मागील काही दिवसांपासून देशात दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे.

आज भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत 779 इतकी भर पडली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागील 24 तासात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या जाहीर केली आहे. त्याचबरोबर मृतांची आणि बरे होऊन घरी परलेल्या रुग्णांची आकडेवारीही जाहीर केली होती. 24 तासात देशात 55 हजार 79 नवीन रुग्ण आढळून आले. तर 779 रुग्णांचा मृत्यू झाला.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 38 हजार 871 इतकी झाली आहे. देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 35 हजार 747 इतकी झाली आहे. धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील 18 हजार रुग्णांचा मृत्यू जुलै महिन्यात झाला आहे.

रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीलाही भारतानं मागे सोडलं आहे. इटलीत कोरोनामुळे आतापर्यंत 35 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या पाच अमेरिका (1 लाख 52 हजार 70), ब्राझील (91 हजार 263), ब्रिटन (46 हजार 84) आणि मेक्सिको (46 हजार) आणि पाचव्या स्थानी भारत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi