आंतरराष्ट्रीयकृषीदेश-विदेश

भारताने पाकिस्तानला होणारी कापूस निर्यात थांबवली…

Newslive मराठी-  पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर भारतीय कापूस निर्यातदारांनी कापूस सौदे पूर्णपणे थांबवले असल्याचे उत्तर भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष राकेश राठी यांनी सांगितले.

जोपर्यंत स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत निर्यात सौदे न करण्याचा निर्णय निर्यातदारांनी घेतला आहे.

दरम्यान, पाकिस्तानात यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाल्याने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात कापसाची गरज आहे. मात्र आता भारतीय निर्यातदारांनी कापूस सौदे थांबवल्याने पाकिस्तानची मोठी गोची होणार आहे. असे राकेश राठी यांनी सांगितले.

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi