आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

लडाखमध्ये चिन्यांच्या घुसखोरीचा डाव भारताने उधळला

भारत चीन दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. लडाख सीमेवर पँगाँग तलाव परिसरात चिनी लष्कराने गेल्या दोन दिवसांत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने चिन्यांचा डाव उधळून लावला. या भागात दोन्ही लष्करामध्ये जबरदस्त झटापट झाली. दरम्यान, चीनने सीमेवर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी क्षेपणास्त्र तैनात केले असून काही भागात जे-20 फायटर विमानेही आणली आहे. यामुळे तणाव वाढला आहे.

चीनच्या युद्धखोरीमुळे लडाख सीमेवर पुन्हा प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जून महिन्यात चिनी लष्कराने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी उभय देशात चर्चा सुरू असतानाच चिनी लष्कराने पुन्हा आगळीक केली.

भारतीय लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसाचारात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनने आपल्या ठार झालेल्या सैनिकांची संख्या अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यानंतर दोन्ही देशांनी प्रत्यक्ष सीमारेषेवरून अडीच किमी मागे जाण्याचा निर्णय घेतला. भविष्यात देखील तणाव वाढण्याची शक्यता आहे.