कोरोनामहाराष्ट्र

भारतीय तज्ज्ञांनी शोधलं कोरोनावर आणखी एक औषध

कोरोना व्हायरस हा संकट संपूर्ण देशभरात आला आहे. कोरोना या विषाणुवर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक अत्यंत प्रभावी असं औषध सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे दुसऱ्या कोणत्या देशात नव्हे तर भारतातच हा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनावरील औषधं लस यासंबंधीच्या चर्चांनी जोर धरला आहे. जवळपास २३ औषधांच्या संशोधनानंतर आयआयटी दिल्लीनं हा दावा केला आहे. ज्यामध्ये teicoplanin नावाच्या ग्‍लायकोपेप्‍टाइड एँटीबॉयोटिक औषधामुळं कोरोनावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये यश आला असल्याचं दावा करण्यात येत आहे. हे औषध एकदोन नव्हे तर तब्बल दहापट अधिक प्रभावी असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

आयआयटी दिल्ली या संस्थेतील कुसुम स्‍कूल ऑफ बायोलॉजिकल सायंसेसनं कोरोनासाठीचं हे औषध शोधण्यासाठी जवळपास २३ औषधांची चाचणी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार इतर औषधांच्या तुलनेत जेव्हा teicoplanin च्या परिणामांची तुलना करुन पाहण्यात आली तेव्हा हे औषध दहा पट अधिक प्रभावी असल्याची बाब लक्षात आली. IIT Delhi तील प्राध्यापक अशोक पटेल हे या निरिक्षणाचं नेतृत्व करत होते. याबाबतत अधिक माहिती देत ते म्हणाले, teicoplanin च्या परिणामांची तुलना इतर औषधांशी करण्यात आली आहे.