महाराष्ट्रलक्षवेधी

राज्यात आंतरजिल्हा बससेवा लवकरच सुरू होणार- विजय वडेट्टीवार

Newsliveमराठी – करोनामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन पडलं आहे. करोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. हळूहळू लॉकडाउन शिथिल केला जात असून, राज्यातही लवकरच आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

राज्यात करोनाचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकारनं प्रवासी वाहतूक बंद करण्याबरोबरच आंतरजिल्हा वाहतूकही थांबवली होती. मार्चच्या अखेरीपासून राज्यातील बससेवा बंद करण्यात आली. त्यानंतर मिशन बिगिन अगेनला सुरूवात झाल्यानंतर जिल्ह्यात बससेवा सुरू करण्यात आली. त्यातही सोशल डिस्टन्सिगचं बंधन घालण्यात आलं होतं. तर आता बससेवा चालू केल्यानंतर त्यामध्ये २० प्रवाशी प्रवास करतील अशी त्यावेळी ते म्हणाले.