महाराष्ट्रराजकारण

कंगना प्रकरणावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव?

अभिनेत्री कंगना रणावत आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. यातच कंगनाचं समर्थन करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती पुढे आली आहे. श्वेता थेट महाराष्ट्रात राम राज्य येण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा वापरली आहे. श्वेता सिंहच्या या पोस्टवर चाहत्यांनीही अनेक कमेंट केल्या आहेत.

कंगना रणावतच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर भडकलेल्या कंगनानं मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करुन टीकास्त्र सोडलं. तिने व्हिडिओ पोस्ट करत जोरदार टीका केली.

ज्या पद्धतीने आज माझं घर तुटलं तसेच तुमचा अहंकारही तुटेल असं कंगना रणावतने म्हटले आहे. कंगनाच्या समर्थनासाठी आलेल्या श्वेताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे देवा, हा कसला गुंडाराज आहे, याप्रकारे अन्याय अजिबात सहन नाही केला पाहिजे. या अन्यायाला उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे आहे का? चला पुन्हा रामराज्य स्थापन करु असं तिने म्हटलं आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. हा भाजपचा डाव नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.