महाराष्ट्रराजकारण

मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? – राधाकृष्ण विखे पाटील

Newslive मराठी-  राज्याचे मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल असा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका करून सरकार मधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

नगर मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले. दूध उत्पादकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. यावेळी मोठ्या प्रमाणावर दूध उत्‍पादक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यात युरीया खताचा काळा बाजार राजरोसपणे सुरू आहे. सोयाबीन बियाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली पण एकाही खासगी कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले नाहीत. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नसल्याची टिकाही विखे पाटील यांनी केली. मुख्‍यमंत्री रोज म्‍हणतात सरकार पाडून दाखवा पण सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही तुम्‍ही तर जनतेच्‍या मनातुन केव्‍हाच पडले आहात असा टोलाही त्‍यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi