महाराष्ट्रलक्षवेधी

आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे झाले सोपे; जाणून घ्या…

आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत यासाठी प्रत्येक माणसाकडे ओळखपत्र आवश्यक आहे. आपल्याला नवीन सिम कार्ड घेण्यापासून ते बँकेत आपले अकाऊंट उघडण्यापर्यंत सगळीकडे आधारकार्डची गरज असते. परंतु, याच आधार कार्डमध्ये एखादी चुक झाली तर अनेकदा त्यातील दुरुस्ती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक किचकट अटींमुळे आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी अनेक वेळ देखील आपला खर्च होतो. मात्र आता काळजीचे कारण नाही.

तसेच अनेक वेळा आपण शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतो. अशा वेळी आधार कार्डवरील पत्ता देखील बदलायचा असतो. यासाठी UIDA ने काही कागदपत्रे ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार पत्ता बदलता येतो. त्यात आता बँक पासबुकचीही भर पडली आहे. अलीकडेच UIDAI ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ऍड्रेस अपडेट करण्याशी संबंधित अनेक महत्वाची माहिती शेअर केली आहे. (Unique Identification Authority of India) म्हणजेच आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया आपल्या आधार ग्राहकांना नवनवीन सुविधा देत असते.

याचबरोबर आधार कार्ड जारी करणारी आणि त्यासंबंधित सेवा पुरवणारी प्राधिकरण UIDAI (Unique Identification Authority of India) ऍड्रेस प्रूफ म्हणून एकूण 45 कागदपत्रे स्वीकारतात. यापैकी कोणाच्याही मदतीने आपला आधारमधील ऍड्रेस अपडेट केला जाऊ शकतो. आता तुम्ही बँक पासबुक वापराने आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता. बँक दाखवून पत्ता बदलायचा असेल तर त्यावर फोटो आवश्यक असून त्यावर बँक अधिकाऱ्यांची सही आवश्‍यक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पासबुकमधील आपल्या फोटोवर शिक्का आणि बँक अधिकाऱ्याची सही आहे का याची खात्री करा.