महाराष्ट्रराजकारण

हे सरकार आहे की भिताड- अजित पवार

Newslive मराठी-  शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ अशी संकटे आल्यावर पवारसाहेब मदत करत होते. परंतु आज नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. हे सरकार आहे की भिताड आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विचारला आहे.

ज्याचं कुटुंब नाही… लग्न झालेले नाही अशा बिनसंसारी माणसाच्या… फकीराच्या हातात देश दिला असेल तर अशा माणसाला वाढलेली महागाई कशी लक्षात येईल,आधी राममंदिर बांधणार मग सरकार असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. अरे चार वर्षे झोपला होतात का? असा सवाल करतानाच अरे उद्धवा अजब तुझे सरकार असा टोलाही पवार यांनी लगावला.

दरम्यान, आमचे सरकार असेपर्यंत ऊसाला साडेसहा रुपये दर देत होतो आणि हे सरकार ४ रुपये देत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती न समजणारे सरकार असेल तर काय अवस्था होते हे आज लक्षात येत आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्याची समुळ जात नष्ट करण्याचा सरकारचा डाव आहे- धनंजय मुंडे