खेळमहाराष्ट्र

देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंवर आली ऊसाचा रस विकण्याची वेळ

कोरोनामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. तब्बल 6 महिन्यांनंतरही कोरोनामुळे भविष्य अंधुकच दिसत आहे. केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दोन खेळाडूंवर चक्क हायवेवर ऊसाचा रस विकण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय कुस्तीपटू अजय आणि राकेश यांना बेरोजगारीमुळे झगडत आहेत.

अजय पाच वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळून तर राकेशनं तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळून राज्याचे प्रतिनिधीत्व केले. एवढेच नाही तर देशाचेही नाव या दोन खेळाडूंनी अनेक वेळा मोठे केले आहे. मात्र आता पैशांसाठी या दोघांना हायवेवर ऊसाचा रस विकून दोन वेळचं अन्न मिळवावं लागत आहे.

आता हे दोघेही राष्ट्रीय महामार्गावर भसाचा रस विकत आहेत. दोन्ही खेळाडूंनी सांगितले की, आयटीआय डिप्लोमा करूनही या दोघांना सरकारकडून नोकरी मिळाली नाही. दोन्ही खेळाडूंनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि कॅबिनेट मंत्री गोविंदसिंग ठाकूर यांच्याकडेही विनवणी केली होती, मात्र आजपर्यंत या दोन्ही खेळाडूंनी आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. भविष्यात तयारी करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.