महाराष्ट्रराजकारण

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशाची माफी मागत दिला राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले. ‘दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली.

यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला वेदना होत आहेत,’ अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.