देश-विदेशशैक्षणिक

JEE, NEET परीक्षा पुढे ढकला; भाजपा खासदाराची मागणी

Newsliveमराठी – ‘जेईई २०२०’ आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच भाजपाचे दिग्गज नेते व राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याकडे नीट व जेईई सारख्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज या संबधी एक ट्विट करत म्हटले की, “मी नुकतीच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना सुचवले आहे की, नीट आणि अन्य परीक्षा दिवाळी नंतर घेतल्या जाव्यात. परीक्षांची तारीख निश्चित करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर सोपवलेल असल्याने, यामध्ये काही अडचण यायला नको. मी तातडीने पंतप्रधानांना या संदर्भात पत्र पाठवणार आहे.”

तसेच, अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी सध्या परीक्षा घेण्यास विरोध करत असलेल्यांना उद्देशुन म्हटले, “मी या अगोदरच ट्विटद्वारे सांगितले आहे की, नीट परीक्षा दिवाळीनंतर घेण्यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. मंत्रीमहोदय आता एका तातडीची बैठकीत आहेत. पाहू आता काय होतं. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर अतिशय शेवटच्या क्षणी मला तुमच्याकडून हस्तक्षेप करण्यास सांगण्यात आले आहे.” याचबरोबर सुब्रमण्यम स्वामींनी असे देखील म्हटले की, जेव्हा मी नीट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असे म्हटले, याचा अर्थ जेईई इत्यादी सारख्या अन्य सर्व परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात.”