देश-विदेशराजकारण

अयोध्या राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पत्रकारास अटक

Newsliveमराठी – अयोध्या राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा पत्रकार प्रशांत कनोजिया याला दिल्लीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. प्रशांत कनोजिया हा मुक्त पत्रकार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राम मंदिराबाबत त्याने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राम मंदिराबाबत त्याने केलेल्या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत म्हणून पोलिसांनी प्रशांत कनोजियाला अटक केली आहे. पोलिसांनी याआधीही त्याला अटक केली होती मात्र त्याची जामिनावर सुटका झाली होती. आता पुन्हा एकदा त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रशांत कनोजियाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाला तुम्हाला निमंत्रण का देण्यात आलं नाही? असा प्रश्न प्रशांत कनोजियाने विचारला होता. यावरुन जातीय तेढ निर्माण होत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रशांतच्या राहत्या घरून त्याला अटक केली आहे.