महाराष्ट्रराजकारण

कंगनाला घाबरण्याची गरज नाही; रामदास आठवले कंगनाच्या भेटीला

आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांनी आज कंगना राणावतची तिच्या घरी भेट घेतली आहे. राजकारणात रुची नसली तरीही समाज एकत्र राहण्यामध्ये असल्याचे कंगनाने आठवलेंना सांगितले. सध्या कंगना आणि शिवसेना यांच्या जोरदार वाद सुरू आहे. ‘रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते बॉलिवूड कंगनाच्या पाठिशी आहेत. मुंबई ही सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे.

कंगनाला घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी भेटीनंतर दिली आहे. ‘माझ्यावर अन्याय झाला आहे. माझे ऑफिस पाडण्यात आले. ऑफिसमधल्या फर्निचरही तोडफोड केली आहे. याप्रकरणी मी कोर्टात जाणार आहे. मला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे या भेटीवेळी कंगना आठवलेंना म्हणाली.

याचबरोबर ‘कंगना ड्रग्स घेत होती हे सामनात कसे छापले, असा प्रश्न आठवलेंनी उपस्थित केला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सामनावर केस व्हायला हवी,’ अशी मागणी आठवले यांनी केली. दरम्यान, कंगना आणि रामदास आठवले यांच्यात दीड तास चर्चा सुरु होती. आता हे प्रकरण अजूनच पेटण्याची शक्यता आहे.