महाराष्ट्रराजकारण

कंगनाची आता सोनिया गांधींवर टीका; म्हणाली, ‘तुमचे सरकार महिलांचा छळ करत आहे’

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. आता कंगनाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना देखील या वादात खेचले आहे. आदरणीय सोनिया गांधीजी, तुमच्या महाराष्ट्रातील सरकारकडून मला जी वागणूक दिली जात आहे. ते पाहून एक स्त्री म्हणून तुम्हाला यातना होत नाहीत का? असा सवाल करत अभिनेत्री कंगना राणावतने आता आपला मोर्चा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे वळवला आहे.

महाराष्ट्रात तुमचे सरकार आहे. तुम्ही देखील एक स्त्री आहात. जी वागणूक मला सध्या महाराष्ट्र सरकारकडून मिळत आहे, ती पाहून एक स्त्री म्हणून तुमच्या मनाला यातना होत नाहीत का? आणि आपण डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील तत्वांचे पालन करण्यास आपल्या सरकारला सांगू शकत नाही का? असे प्रश्न तिने आपल्या ट्विटमधून उपस्थितीत केले आहेत. कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “आपण देखील पाश्चिमात्त्य देशात जन्मलात-वाढलात आणि मग भारतात येवून स्थायिक झालात.

कंगनाने मुंबईतील परिस्थिती ही पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे झाली असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाला हिमाचल प्रदेशमधून मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप तिने केला होता. या धमक्यांना न घाबरता ती 9 तारखेला मुंबईत दाखल झाली.