महाराष्ट्रराजकारण

कंगना रणावतने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

सध्या कंगना रणावत चांगलीच चर्चेत आली आहे. मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती चर्चेत आली आहे. आता कंगना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झाली आहे. कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांची भेट होत आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आक्रमक टीका करणारी अभिनेत्री कंगना रणावत मुंबई व मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानानंतर टीकेची झोड उठली होती. त्यावरून कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही बघायला मिळालं होतं.

महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यामुळे कंगना चांगलीच भडकली होती. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगनानं आज राज्यपालांची भेट घेतली. भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलं नाही. यावेळी कंगनाची बहीणही उपस्थित होती. आता या भेटीनंतर ती काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.