महाराष्ट्रराजकारण

कंगना रणावत मेंटल वुमन आहे, शिवसेनेचा शाब्दिक हल्ला

सध्या संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणावत यांच्यात जोरदार टीका सुरू आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेनेने अभिनेत्री कंगना राणावतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनातून कंगनाला मेंटल वुमन असे म्हटले आहे.

सामना संपादकीयमध्ये शिवसेनेने म्हटले की मेंटल वुमन कंगनाला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही आहे कारण तिने मुंबई तसेच येथील पोलिसांचा अपमान केला आहे. सोमवारी सामनाच्या संपादकीयमध्ये विधानसभेच्या सत्राबाबत माहिती देत भाजप पक्षावरही जोरदार टीका केली.

सुशांत प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना राणावत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा देखील दिली आहे. यावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे. कंगनाला महाराष्ट्रात येऊन देणार नाही असेही शिवसेना म्हटली आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर मला मुंबईत येण्यापासून अडवून दाखवा असेही कंगना रणावत काही दिवसांपूर्वी म्हणाली आहे.