महाराष्ट्रराजकारण

कंगना रणावत हिमाचला रवाना, जाताना ट्विट करून म्हणाली..

अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेना यांच्या गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरु होतं. तिचे मुंबई बद्दल वक्तव्य नंतर पालिकेने तिच्या ऑफिसवर केलेली कारवाई यानंतर राज्यपालांची भेट यामुळे ती सतत चर्चेत आली आहे. मुंबईविरोधात भाष्य केल्यांनंतर कंगणा मुंबईत देखील आली होती. त्यानंतर आता पुन्हा कंगणा हिमाचलला गेली आहे. जाताना देखील कंगणाने एक ट्विट केलं आहे.

या ट्विटच्या माध्यमातून कंगणाने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कंगणाचं हे नवीन ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. कंगणा तिच्या ट्विटमध्ये म्हणते, ‘मी जड अंतःकरणाने मुंबई सोडून जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मला प्रचंड त्रास देण्यात आला. यावेळी माझ्यावर खोटे आरोप केले गेले. इतकंच नव्हे तर माझं कार्यालय तोडलं.

माझं घर तोडण्याची धमकीही दिली गेली. सुरक्षारक्षक हत्यारं घेऊन माझं संरक्षण करत आहेत. मला वाटतं आहे की पाकिस्तानशी तुलना करणं योग्यचं होतं. कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. त्यानंतर अनेकांनी कंगणाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगणानेही माघार न घेता मुंबईत येऊन दाखवलं.