महाराष्ट्र राजकारण

लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकायचे ध्येय ठेवा – मुख्यमंत्री

Newslive मराठी-  २०१४ च्या निवडणुकीपेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल असा विश्वास व्यक्त करत राज्यातील ४८ पैकी ४० लोकसभा मतदारसंघ जिंकायचे ध्येय ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

मोदींनी प्रत्येक घरापर्यंत गॅस पोहचवला ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या सर्व योजनांची बेरीज केली आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहचलो तर आपला विजय नक्की होईल. एकहाती सत्ता मिळवायची असेल तर दोन कोटी मतांची आवश्यकता आहे. सरकारी योजना यापेक्षाही जास्त लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे या लोकांपर्यंत भाजप सरकारची विकासकामे आपल्याला पोहचवायची आहेत. असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, २०१९ ची निवडणूक सोशल मीडियावर होणार आहे. चार मतदारसंघांतील व्यक्तींकडे आपण कसे पोहचू याकडे कार्यकत्यांनी लक्ष द्यावे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *