आंतरराष्ट्रीयदेश-विदेशलक्षवेधी

दिल्लीच्या जनतेला केजरीवालांचा मोठा दिलासा, प्रतिलिटर डिझेल आठ रुपयांनी स्वस्त

Newslive मराठी-  दिल्ली सरकारने दिल्लीच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. डिझेलवरील वॅटमध्ये मोठी कपात केली आहे. दिल्ली सरकारने डिझेलवर आकारण्यात येणारा वॅट कर 30 टक्क्यावरुन 16.75 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर 82 वरुन 73.64 रुपये होणार आहेत. दिल्लीत प्रतिलिटर डिझेलवर 8.36 रुपये कमी होणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिझेलवरील वॅट कर 30 वरुन 16.75 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचे दर 82 वरुन 73.64 होणार आहेत. अशी माहिती केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

दिल्लीची अर्थव्यवस्था पुनर्जीवित करणे एक मोठे आव्हान आहे. पण जनतेच्या सहकार्याने हे साध्य करुअसे अरविंद केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आता प्रतिलिटर डिझेलचा दर 82 ऐवजी 73.64 रुपये असेल. दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांनी दर कमी करण्याची मागणी केली होती असे केजरीवाल म्हणाले. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे महागाईचा सुद्धा भडका उडतो. आता डिझेलचे दर कमी करुन महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा