मनोरंजन

‘खंडेराया झाली माझी दैना’ नंतर आता ‘सुरमई’चा तडका

Newslive मराठी- पिंपळगाव हरेश्वर या गावातील चेतन रवींद्र गरुड याचे ‘खंडेराया झाली माझी दैना’ या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यातच त्याचे ‘सुरमई’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

हे कोळी गीत गायक आदर्श शिंदे यांनी गायले आहे. अगदी प्रत्येकाला प्रेमात पाडायला लावेल असे या गाण्याचे संकलन केले आहे. त्यामुळे कोळीगीतांची क्रेझ अजून वाढणार आहे.

अमित बाईंग दिगदर्शित आणि प्रवीण शिंदे, पूजा कासकर यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीत रंगलेले ‘सुरमई’ हे कोळी गीत रसिक-प्रेक्षकांना नक्कीच ताल धरायला लावणार आहे. खंडेराया’ नंतर आता ‘सुरमई’ला ही प्रेक्षक पसंती लाभेल यात काही शंका नाही.