Newslive मराठी- ‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आलं. आशुतोष हा 32 वर्षांचा होता. आशुतोषने गळफास लावून स्वत:चे आयुष्य संपवले.
या घटनेमुळे आशुतोषच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आशुतोषने हे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भात कोणताही माहिती समोर आलेली नाही. आशुतोषच्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून चालू आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येसंदर्भातील एक व्हिडिओही आपल्या फेसबुक प्रोफाइलवरुन पोस्ट केला होता. यामध्ये त्याने माणूस आत्महत्या का करतो यासंदर्भात आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये आशुतोषनेच असे पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलीस सध्या या व्हिडिओचा आशुतोषच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का या दृष्टीनेही तपास करत आहेत. 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास आशुतोषने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मयुरीने 20 जानेवारी 2016 रोजी आशुतोष देशमुखबरोबर लग्न केलं होत.
आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’मधून मयुरी घराघरात पोहचली होती . त्यानंतर तिने काही व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं. मयुरीने लिहिलेले–दिग्दर्शित केलेले ‘डिअर आजो’ रंगभूमीवर चांगलेच गाजले. लॉकडाउनचे निर्बंध लागण्याआधी मयुरी ‘बादशाह हम’ या नाटकात काम करत होती.
बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi