महाराष्ट्र

किर्तनकार ह. भ. प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे निधन

Newslive मराठी- महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह. भ. प. बाबासाहेब महाराज इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते.

ते बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील रहिवासी होते. दरम्यान, त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून नामस्मरण सत्संग सदाचार आदी गोष्टींमध्ये लोकांना प्रवृत्त केले होते.