कोरोनामहाराष्ट्र

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 53 लाखांवर

देशात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आता रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ८ हजार १५ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १३ हजार ९६४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ८५ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४२ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा कोटी २४ लाख ५४ हजार २५४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. अमेरिकानंतर भारतामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे.

गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ९५ हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. स्रायलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शुक्रवारी दुपारपासून तीन आठवड्यांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यात व्यावसायिक आस्थापनेही बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे आता अजून काळजी घेण्याची गरज आहे.