कोरोनामहाराष्ट्र

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली- अरविंद केजरीवाल

देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यातच कोरोनाचे दुसरी लाट येणार असे म्हटले जात होते. मात्र महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत दिवसाला चार हजार रुग्ण आढळत होते. दिल्लीत आलेली कोरोनाची ही दुसरी लाट होती असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना असल्याचे केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले की, तज्ञांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीत २ लाख ५६ हजार ७८९ कोरोना रुग्ण आहेत. दिल्लीत ९ सप्टेंबरला पहिल्यांदा दिवसाला चार हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले होते. त्यादिवशी २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

१६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ४५०० रुग्ण आढळले होते. यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. नंतर ही संख्या ३७०० वर आली. येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या अजून कमी होत जाईल, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. राजधानीत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही दिवसातील सर्वाधिक संख्या होती. मार्च महिन्यात दिल्लीत पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. यानंतर तेथील रुग्णसंख्या वाढतच आहे.