देश-विदेशबातमी

कोझिकोडे विमान अपघातातील मृतांची संख्या १८

 

Newsliveमराठी – केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शनिवारी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेमागील कारणांचा उलगडा होऊ शकेल. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान. एका जखमी विमान प्रवाशाचा शनिवारी मृत्यू झाल्याने बळींची संख्या १८वर पोहोचली आहे.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. विमानाचा डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर सापडले असून विमान अपघात चौकशी संस्थेने तपास सुरू केला आहे.

आणखी एका जखमी प्रवाशाचा शनिवारी मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. एक मृत प्रवासी करोनाग्रस्त आढळल्याने मदतकार्यात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात पाठवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, तर गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  मदतकार्यासाठी दिल्लीहून दोन, तर मुंबईहून एक विमान दाखल झाले आहे.