महाराष्ट्रराजकारण

कामगार विधयेक मंजुर, आता कामगारही उतरणार रस्त्यावर

कृषी विधेयकाला विरोध होत असतनाच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कामगार विधेयक मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱयांपाठोपाठ आता कामगारही रस्त्यावर येणार आहेत. नवे कामगार धोरण हे औद्योगिक शांततेचा भंग करणारे आहे, असा घरचा आहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या भारतीय मजदूर संघाने दिला आहे.

तसेच सरकारच्या या कामगार विधेयकांविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला आहे. बुधवारी रात्री केंद्र सरकारने तीन कामगार विधेयके संसदेत मंजूर करून घेतली. देशाचे संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन या कामगार विधेयकांमध्ये झालेले नाही, असे मजदूर संघाचे म्हणणे आहे. या विधेयकांमुळे औद्योगिक शांतता भंग होईल.

उद्योगपती धार्जीने हे विधेयके असून, कामगार विरोधी तरतुदी यात आहेत. नोकऱ्यांवर गदा येणार आहे. पुढील आठवड्यात 2, 3 आणि 4 ऑक्टोबरला भारतीय मजदूर संघाचे संमेलन होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती संघाच्यावतीने देण्यात आली.