कोरोनामहाराष्ट्र

पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता- अजित पवार

देशात कोरोनामुळे अनेक रुग्ण दगावले आहेत. पुण्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगात वाढत आहे. त्याचबरोबर सोई-सुविधांवर ताण येत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात आज लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर आणि अ‍ॅब्युलन्सची कमतरता आहे, काही चुका झाल्या आहेत अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले,ऑक्सिजन सिलेंडर जेवढे पाहिजे तेवढे मिळत माहीत हे वस्तूस्थिती आहे. अ‍ॅब्युलन्सच्या तक्रारी मान्य आहेत. जम्बो वर अचानक जास्त पेशंट्सचा भार पडला. त्यामुळे व्यवस्था कोलमडली ही वस्तुस्थिती आहे. ससूनचा ऑक्सीजन तुटवडा प्रॉब्लेम झाला म्हणून जम्बोत पेशंट पाठवले.

अनेक रुग्ण ऑक्सीजन अभावी मृत्युमुखी पडत आहेत. नुकतेच एका पत्रकाराचा अ‍ॅब्युलन्सच्या अभावी मृत्यू झाला यामुळे पुण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे.