Newslive मराठी- पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता जर पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. तर पाटबंधारे खात्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात येईल. अशा अशा शब्दात महापौर मुक्ता टिळक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले होते.
काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ”गल्ली ते दिल्ली तुमचा थाट…शंभर नगरसेवक आमदार आठ…पुण्याच्या पाण्याची लावली वाट’….अशा आशयाच्या पोस्टरमधून पुणेकरांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे. हे पोस्टर सर्वाचे लक्ष वेधून घेतले जात आहे.
दरम्यान, पुण्यातील पाणी प्रश्नावरुन महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील वादात पुणेकर भरडले जात आहे. यापार्श्वभूमीवर वैतागलेल्या पुणेकरांनी असे पोस्टर लावले असल्याची चर्चा सुरु आहे.