बातमी महाराष्ट्र

भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

Newslive मराठी- विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे याचा दणदणीत पराभव करून जिंकून आलेले राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी आज भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे… भावा- बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!” असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सोमवारी (ता.28) धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सुळेंच्या फोटोसोबत ट्विट करत मुंडेंनी “मानलेलं जरी असलं…तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं… बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं! उद्या भाऊबीज व आजच गोविंदबागेत सुप्रियाताई सुळे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला आहे.

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *