आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू; चीनची भारताला धमकी

भारत- चीन दरम्यान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच पुन्हा एकदा चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. भारतीय लष्कराने यासंबंधी माहिती दिली आहे.

चीनने भारताला स्पर्धेत गुंतण्याची इच्छा असेल तर भूतकाळात झालं नाही इतकं मोठं लष्करी नुकसान करु अशी धमकी दिली आहे. सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने भारताला धमकावलं आहे. यामुळे आता अजून तणाव वाढण्याची शक्यता आहे.

भारताने सोमवारी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा डाव उधळल्यानंतर त्याच दिवशी चिनी सैन्यांच्या प्रवक्त्याकडून भारताने बिजिंगमधून सैन्य मागे घेण्याची मागणी करत अनधिकृतपणे नियंत्रण रेषा ओलांडला असल्याचा आरोप केला. यामुळे हा संघर्ष वाढला होता.