महाराष्ट्रराजकारण

राज्यातील लोकल, मंदिरे आणि जिम बंदच राहणार- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून लोकल, मंदिरे आणि जीम सुरू करण्याची मागणी होत  होती. पण आज मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले की इतक्या लवकर तर राज्यातील लोकल, मंदिरे, जीम सुरू होणार नाही.

उद्धव ठाकरे यांनी मला गर्दी नकोय असे म्हटले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनपूर्वी ज्याप्रमाणे लोकल सेवा सुरू होती तशी लोकल सेवा सध्यातरी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जीम सुरू करण्याबाबत लवकरच नियमावली आखण्यात येणार आहे.

जीममध्ये व्यायाम करत असताना हार्टच पम्पींग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढून कोरोणाचा प्रसार होऊ शकतो. मंदिर उघडण्याच्या मागणीवर उद्धव ठाकरे म्हणाले की मंदिर बेद ठेवण्याची आमची इच्छा नाही. मात्र उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.