कोरोनामहाराष्ट्र

लॉकडाऊन की अनलॉक या वादात न राहता आता अनलॉकच करा- देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी- समाजातील बारा शेतमजूर, बलुतेदार रस्त्यावर काम करणारे कामगार यांसारख्या लोकांवर आता जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढाई लढत असताना लॉकडाऊन की, अनलॉक या वादात न राहता आता अनलॉकच करा असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केले.

ते एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. राज्य सरकारसमोर काही अडचणी आहेत. विशेषतः आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु, याकाळात केंद्र सरकारनेही मोठ्या प्रमाणात राज्याला मदत केली आहे. जीएसटीचे 19 हजार 200 कोटी रुपये मिळाले आहेत. आत्मनिर्भर पॅकेजमधून जवळपास 28 हजार कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात.

त्यामुळे आता हातपाय गाळून चालणार नाही, थोडी हिंमत दाखवावी आणि काही पावले उचलावी लागतील. पण पुन्हा अर्थव्यवस्थेला उभे करण्याच्या दृष्टीने तयारी केली नाही, तर उद्या सेवा क्षेत्रावर आणि उद्योगांवर जो काही परिणाम होणार आहे, त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांच्या कमिटी तयार केल्या होत्या. त्यातील तज्ज्ञांचे अहवाल येऊन पडले आहेत, आता या अहवालांवर कारवाई होणे गरजेचे आहे. जर कारवाई झालीच नाही तर अहवालांचा फायदा काय? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राबद्दल जे व्हिजन मी मांडत होतो. तेच व्हिजन आताही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी, महाराष्ट्र तोच आहे. माझी महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तीच आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi