कोरोनामहाराष्ट्र

लोणावळ्यात पुन्हा पर्यटकांची गर्दी; हॉटेल्स फुल्ल

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. कोठे जायचे असेल तर पासची गरज होती. मात्र राज्य सरकारने प्रवासासाठी ‘ई पास’ची अट शिथिल केल्यानंतर लोणावळा, खंडाळ्यात गेले दोन दिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. शहरातील सर्व रिसॉर्टस्‌, हॉटेल्स, बंगले जवळपास फुल्ल आहेत. मात्र, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांना कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र आहे.

लोणावळ्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. कोविड 19 पार्श्‍वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल, रिसॉर्ट गेले सहा महिने बंद आहे. चिक्की उत्पादक, लहान-मोठे विक्रेते, टुरिस्ट व्यवसायावर संक्रांत आली. मंदीचे सावट असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. सहा महिन्यांनंतर दुकाने खुली झाली.

पर्यटक येत असले तरी सध्या अजूनही घरी बसून काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र अनेक लोक फिरत आहेत. काही ठिकाणी काळजी देखील घेतली जात नाही. मास्कचा देखील वापर होत नाही. येणाऱ्या काळात अजून रुग्ण संख्या वाढणार आहे.