महाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणारांच्या संख्येत आघाडी कायम

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव एकीकडे झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्येतही दरररोज भर पडत असल्याचे दिसून येत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी करोनावर मात केली आहे.

विशेष म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. एका दिवसात राज्यात १३ हजार जणांनी करोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो, या ठिकाणी एका दिवसात १० हजारापेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जवळपास ५७ टक्के नवे करोनाबाधित हे पाच राज्यांमधील आहेत.

तर, करोनामुक्त झालेल्या एकूण संख्येतील ५८ टक्के रुग्ण देखील याच पाच राज्यांमधील आहेत. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची देशभरातील संख्या आता ३७ लाख २ हजार ५९५ वर पोहचली असून, देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ७७.८८ टक्क्यांवर आहे. यामधील ५८ टक्के बरे झालेले रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.