कृषीमहाराष्ट्र

देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं थांबले नसल्याची स्थिती आहे. एनसीबीआरनं वर्ष २०१९मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली असून, या आकडेवारीनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील शेतकरी आत्महत्यांच्या क्रमवारीत दुर्वैवानं महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

कृषी सुधारणांसह कर्जमाफी करत दिलासा दिल्यानंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं सत्र कायम आहे. काळजीची बाब म्हणजे देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०१९ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी एनसीआरबीनं जाहीर केली असून, त्यात देशात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे.

या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचं एनसीआरबीची आकडेवारी सांगते. राज्यात २०१४, २०१५, २०१६ आणि २०१९मध्ये ३ हजार ५०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. २०१७ व २०१८ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची एनसीआरबीनं नोंद केलेली नाही.