कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 9 हजार 566 वर

Newslive मराठी- राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता कोरोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता 9 हजार 566 वर पोहचली आहे.

राज्यातील 9 हजार 566 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 988 अधिकारी 8578 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीस 224 अधिकारी 1705 कर्मचारी मिळून 1 हजार 929 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर, 755 अधिकारी 6779 कर्मचारी मिळून एकूण 7 हजार 534 पोलीस आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 103 पोलिसांचा मृत्यू झालेला असून, यामध्ये 9 अधिकारी 94 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरातही दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्येने आता 17 लाखांटा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल 54 हजार 736 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 17 लाख 50 हजार 724 वर पोहचली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi