महाराष्ट्रराजकारण

गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल- अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर, महाराष्ट्राला लवकर करोनामुक्त कर, असं साकडं अजित पवार यांनी बाप्पांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं भक्तीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनामुळे यंदा सर्वच सण हे साधेपणाने साजरे केले जात आहेत.

भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करावा, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही.

बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील करोनाचा संसर्ग रोखला जाईल तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर करोनामुक्त होण्यास मदत होईल असा मला विश्वास आहे, असं अजित पवार म्हणाले.

नागरिकांनी घरातल्या गणपतींचे घरातच तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन देखील साधेपणाने करणं गरजेचं आहे. यासाठी कोणीही सार्वजनिक विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील गणेशोत्सवयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.