महाराष्ट्रराजकारण

बकरी ईद’ वरून महाविकास आघाडी सरकारमध्येच नाराजी!

Newslive मराठी- गेल्या अनेक दिसवांपासून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरूच आहे. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या ‘बकरी ईद’ वरून आता महाविकास आघाडी सरकारामध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील मुस्लिम नेत्यांमध्ये बकरी ईद यावरून नाराजी पसरली आहे.

काँग्रेस आमदार झिसान सिद्धिकी यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. वांद्रे (पूर्व) काँग्रेस आमदार झिसान सिद्धिकी यांनी सांगितलं की, महाविकास आघाडी सरकारने कुर्बानीसाठी बकरा ऑनलाइन खरेदीची परवानगी दिली. या निर्णयाला सुरूवातीपासूनच विरोध करण्यात आला होता.

सरकारनं आपला निर्णय बदलावा, अशी मागणीही करण्यात आली होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली. मात्र, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. एक दिवसांवर बकरी ईद हा सण आला असूनही सरकारने आपल्या निर्णयात बदल केलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाची मी माफी मागतो, यापुढे समाजाचे मुद्दे यासाठी वारंवार प्रयत्न करू, असं आमदार झिसान सिद्धिकी यांनी म्हटलं आहे.

ऑनलाइन बकरी खरेदी करणे कठीण तसेच कुर्बानी देण्यावरून सरकारमधील मुस्लिम आमदार नाराज झाले आहेत. बकऱ्याच्या गाड्यांना पोलिसांनी शहरात प्रवेश न दिल्याने आता काँग्रेस पक्षातील आमदारांनी नाराजी सूर काढला आहे. काँग्रेस आमदार झिसान सिद्धिकी यांनी स्वत:च्या सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, याआधी माजी मंत्री नसीम खान यांनी सरकार विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती. शरद पवारांबरोबर बैठक देखील झाली होती. मात्र त्यामध्ये तोडगा निघाला नाही.

महत्वाच्या बातम्या- 

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे