महाराष्ट्र

म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करा- राजेश टोपे

News मराठी-  राज्यात म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे अशा सूचना विभागाला दिल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे म्हणाले, काळी बुरशी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. मात्र त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभग प्रयत्न करीत आहे.

या आजारावरील रुग्णांसाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असे नाही. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगिले.

राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथक देखील नेमावे, अशा सुचना केल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज ५००० इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आले असून हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

-राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला- रोहित पवार