बातमीमहाराष्ट्र

स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मराठा समाज ‘मागास’ आहे….

Newslive मराठी-  मराठा समाज हा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मागास प्रवर्गात होता. मात्र केंद्रसरकारने मागास समाजांच्या यादीतून वगळण्यात आल्याने, अनेक दशकांपासून  मराठा समाजाला असमान अशा तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. असा निष्कर्ष अहवालात मांडला आहे.

मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) असून, या समाजाचे सरकारी सेवांमध्ये अपुरे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे या समाजाला राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे आरक्षणाचे लाभ मिळायला हवेत’, अशी अंतिम शिफारस करताना या समाजाच्या मागासपणाचा उहापोह आयोगाने अहवालात केला आहे.

दरम्यान, मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे की नाही, हे तपासण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यीय आयोगाने तीन खंडांमध्ये दिलेल्या अहवालातील अनेक निष्कर्षांपैकी हा एक महत्त्वाचा निष्कर्ष आहे.