महाराष्ट्रराजकारण

मराठा नेत्यांनाच आरक्षण नको आहे- चंद्रकांत पाटील

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून जोरदार राजकारण पेटले आहे. भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मराठा समाज बॅकवर्ड झाला तर त्यांच्या नावापुढेही बॅकवर्ड लागणार. त्यामुळे मराठा समाजातील मोठय़ा नेत्यांनाच आरक्षण नको आहे. शिवाय, मराठा समाज गरीब, बेरोजगार राहिला तर त्यांच्यामागे फिरत राहील. हेच या मोठय़ा नेत्यांना हवे आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून तसेच मागील आठवडय़ातही आपण हा आरोप केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा समाजासाठी न्यायालयात टिकणारे आरक्षण दिल्याचा दावा यापूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारकडून करण्यात येत होता, पण सर्वोच्च न्यायालयात नुकतीच याला अंतरिम स्थगिती देण्यात आली.

त्याचे खापर आता महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.