महाराष्ट्रराजकारण

‘मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही’

Newslive मराठी- मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या असून त्यावर सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. तीन सदस्यीय खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारनं पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली.

तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिलं. त्यानंतर सुनावणी होईपर्यंत नोकर भरती करु नये, असं सांगत न्यायालयानं याचिकांवर 1 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय सोमवारी दिला

दरम्यान, यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नसल्याचं म्हटलं. तसंच याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावं, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

-पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

-देशभरात 24 तासांत 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 654 जणांचा मृत्यू