महाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यांना फोन

सध्या मराठा आरक्षण प्रकरणी जोरदार राजकारण पेटले आहे. नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे अंतिम निर्णयासाठी पाठवले आहे. यावरून राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याचसंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण बहाल करण्यासाठी सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचं संपूर्ण सहाकार्य असेल असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी माझ्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मराठा आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप केले गेले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका केली, मात्र आता हे राजकारण पेटणार आहे