महाराष्ट्रराजकारण

मराठा आंदोलन चिघळले, सोलापूर बंदची हाक

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र मराठा संघटनांचे आंदोलन सुरुच आहे. अशातच आज मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोलापुरात आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली आहे. माढ्यात तर रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. सोलापुरात एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलीस तैनात आहेत.

सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षण स्थिगिती विरोधात आज बंद पुकारण्यात आला आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या.

मराठा आरक्षण स्थगिती प्रकरणी आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखून धरला. माढ्यात रस्त्यावर टायर जाळल्यानंतर वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.